Best Computer Course
हे कॉम्प्युटर कोर्स आहेत फायदेशीर …!
Best Computer Course
Table of Contents
नमस्कार मित्रांनो, Best Computer Course सध्याच्या काळात कॉम्प्युटर चा उपयोग अधिक वाढला आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये कॉम्प्युटर चा उपयोग केला जातो.
तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा तुम्ही 11 वी, 12 वी मध्ये उत्तीर्ण झाले असाल. आता तुम्ही अश्या कॉम्प्युटर कोर्स च्या शोधात आहात जे तुम्हाला भविष्यामध्ये एक चांगली नोकरी मिळवून देईल, तर ही पोस्ट तुमच्या कामाची आहे.


सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन भरपूर कॉम्प्युटर कोर्स उपलब्ध आहेत. म्हणून विद्यार्थी हे गोंधळून जातात. कारण त्यांना माहीत नसते की कोणता कोर्स चांगला आहे.
आपण या पोस्ट मध्ये काही कॉम्प्युटर कोर्स विषयी माहिती घेणार आहोत, जे तुम्हाला भविष्यामध्ये नोकरी मिळवून देईल.
ज्या कोर्स मध्ये तुमची आवड आहे त्या कोर्स मध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता.
बेसिक कॉम्प्युटर कोर्स (BCC)
तूम्ही जर कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये नवीन असाल तर तुम्हाला कॉम्प्युटर ची बेसिक माहिती असणे आवश्यक आहे. त्या साठी तुम्हाला Basic Computer Course करणे आवश्यक आहे.
BCC या कोर्स ची सुरुवात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
( NIEIT ) यांनी 2011 साली या कोर्स ची सुरुवात केली.
या कोर्स चा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये साक्षर बनविणे आहे .
या कोर्स मध्ये तुम्हाला थिअरी, कॉम्प्युटर
ट्यूटोरियल आणि प्रॅक्टिकलद्वारे कॉम्प्युटर विषयी बेसिक माहिती दिली जाते.
तुम्ही हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटर विषयी बेसिक माहिती होईल. तुम्ही व्यावसायिक कामामध्ये आणि वैयक्तिक कामामध्ये कॉम्प्युटर चा उपयोग करू शकता.
Best Computer Course
डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ( DCA )
Diploma in Computer Application हा एक कॉम्प्युटर मधील डिप्लोमा कोर्स आहे. या कोर्स चा कालावधी 6 महिन्याचा आहे. परंतु कोणत्या संस्थेमध्ये या कोर्स चा कालावधी हा एक वर्षाचा पण असू शकतो.
10 वी 12 वी नंतर विद्यार्थी हा कोर्स करू शकतात.
या कोर्स मध्ये कॉम्प्युटर मधील ॲप्लिकेशन चा सखोल माहिती देण्यात येते.
Click here 👇
Career After Matric या शाखेमध्ये करा प्रवेश…! 10 वी नंतर काय करावे…?
म्हणजे या कोर्स मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर विषयी बेसिक माहिती, एम. एस.ऑफिस, टॅली, इंटरनेट विषयी बेसिक माहिती, ऑपरेटिंग सिस्टम आणि प्रोग्रामिंग लँग्वेज विषयी माहिती दिली जाते.
डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन हा कोर्स केल्यानंतर तुमच्यासाठी करिअरचे अनेक पर्याय खुले होतात. Best Computer Course
याशिवाय तुम्ही वेगवेगळ्या कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये नोकरी साठी अर्ज करू शकता.
डिप्लोमा इन कॉम्प्युटर प्रोग्रामिंग ( DCP )
DCP म्हणजे Diploma in Computer Programming आहे. या कोर्स चा कालावधी 6 महिन्याचा आहे. जे विद्यार्थी प्रोग्रामिंग या विषयामध्ये करिअर बनविणार आहे त्यांच्या साठी हा एक सर्वात चांगला कोर्स आहे.
या कोर्स मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग विषयी माहिती शकविण्यात येते.
डिप्लोमा इन कॉम्प्युटर प्रोग्रामिंग हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रामर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी मिळू शकते.
वेब डिझायनिंग ( Web Designing )
जर तुम्हाला वेबसाईट डिझाईन मध्ये आवड असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. या कोर्स च्या अंतर्गत तुम्हाला व्हिज्युअल डिझाइन विषयी माहिती दिली जाते. त्यासोबच प्रोग्रामिंग भाषा ( HTML, CSS, JS ) या भाषा या कोर्स मध्ये शिकविले जाते.
Best Computer Course
वेब डिझायनिंग हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही एक वेब डिझायनर बनता. वेबसाइट बनविणे, वेब पेज चे डिझाइन बनविणे आणि लेआऊट बनविणे हे तुमचे मुख्य काम आहे.
वेब डिझायनिंग हा करिअर बनविण्यासाठी चांगला पर्याय आहे.
ग्राफिक डिझाइन ( Graphic Design )
जर तुम्हाला ड्रॉइंग ( चित्रकला ) किंवा पेंटिंग ची आवड असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. तुमच्यासाठी हा एक चांगला कोर्स आहे.
या मध्ये तुम्हाला फोटो बनविणे, सिम्बॉल बनविणे, कलर, लोगो बनविणे,
टायपोग्राफी इत्यादी विषयी माहिती दिली जाते.
10 वी 12 वी नंतर तुम्ही हा कोर्स करू शकता.
मायक्रोसॉफ्ट ऑफिस
( Microsoft Office )
कॉम्प्युटर मधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे
मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे. प्रत्येक वापरकर्त्याला मायक्रोसॉफ्ट ऑफिस येणे आवश्यक आहे. आजकल बरेच कार्यालये आणि व्यवसाय मध्ये याचा उपयोग होतो.
तुम्हाला जर अकाउंटिंग, ऑफिस एडमिनिस्ट्रेशन, सेल्स आणि इन्शुरन्स कंपनी, इत्यादी मध्ये नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला मायक्रोसॉफ्टचे एम एस वर्ड, पावरपॉइंट, एक्सल, इत्यादी विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
या कोर्स ला तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकतात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वरील नोकरी मिळण्याची शक्यता असते.
Career After Matric 10 वी नंतर काय करावे…?
टॅली ( Tally )
जर तुम्हाला फायनान्स क्षेत्रामध्ये आणि अकाउंटिंग क्षेत्रामध्ये आवड असल्यास तुम्ही
टॅली हा कॉम्प्युटर कोर्स करू शकता. टॅली हा एक अकाऊंटिंग सॉफ्टवेअर आहे.
याचा उपयोग सर्व छोटे मोठे व्यवसायिक करतात.
टॅली या कोर्स मध्ये तुम्हाला रेकॉर्ड बनविणे आणि फायनान्शियल स्टेटमेंट बनविणे शिकविले जाते. टॅली हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते.
Best Computer Course
ह्या कॉम्प्युटर कोर्स मुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. तुम्हाला जर या व्यतिरिक्त दुसरा कोणता कोर्स करायचा असेल तर त्या कोर्स विषयी आधी माहिती करून घ्या.
पोस्ट आवडल्यास इतरांना शेअर करा.