Career After Matric
10 वी नंतर काय करावे…?
Career After Matric
Table of Contents
नमस्कार मित्रांनो, सध्याच्या काळात प्रत्येक दहावी उत्तीर्ण Career After Matric झालेल्या विद्यार्थ्यांना एकच प्रश्न पडलेला असतो, ते म्हणजे 10 वी नंतर काय करावे..?
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या करिअर बाबत खूप गंभीर असतात.
त्यांच्या मनात एकच शंका असते ते म्हणजे दहावी नंतर काय करावे..? दहावी नंतर कोणत्या शाखेमध्ये प्रवेश करावा..? दहावी नंतर कोणता विषय निवडावा..?
जर कोणत्या विद्यार्थ्याला दहावी नंतर अभ्यास करायचा नसेल किंवा अभ्यास होत नसेल तर कोणत्या शाखेमध्ये प्रवेश करावा, ज्यामध्ये जास्त अभ्यास करायची गरज नसेल. असे विद्यार्थी कधी कधी चुकीचे मार्ग निवडतात.
किंवा ते विद्यार्थी कोठेतरी नोकरी करण्याचा पर्याय निवडतात.


10 वी नंतर काय करावे…?
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर Career After Matric अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक योग्य करिअर निवडताना अनेक चुका करतात.
त्यामुळे प्रवेश करताना योग्य कॉलेज निवडणे. त्यासोबत योग्य शाखा निवडणे हे गरजेचे असते.
विद्यार्थ्याने आणि त्यांच्या पालकाने दहावीनंतर झालेल्या चुका ह्या जाणून घेणे आवश्यक आहे. आणि त्या चुका टाळणे अंत्यत गरजेचे आहे.
Click here 👇
Career After Matric या शाखेमध्ये करा प्रवेश…! 10 वी नंतर काय करावे…?
दहावी नंतर चुका होण्याचे प्रमुख कारण
- 1) दहावी ची परीक्षा ही बोर्डाद्वारे घेतली जाते.
- 2 ) या परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला मार्क्स खूप महत्त्वाचे असते.
- 3 ) दहावी पर्यंत विद्यार्थ्याला सगळ्या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक असते. परंतु दहावी नंतर त्यांना त्या विषयातून कोणतातरी एक विषय निवडावा लागतो.
- 4 ) काही विद्यार्थ्याला भविष्यामध्ये काय करायचे आहे, कोणत्या फिल्ड मध्ये जायचे आहे हेच माहित नसते.
तुम्ही जर दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना विचारले की तुम्ही दहावी नंतर काय करणार..!
Career After Matric
तर बरेच विद्यार्थ्यांचे उत्तर असते 11 वी आणि 12 वी करणार.
हा घेतलेला निर्णय बरोबर आहे. परंतु त्या मध्ये योग्य शाखा निवडणे आवश्यक आहे.
काही विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती बिकट असते, त्यामुळे त्यांना ज्या शाखेमध्ये प्रवेश करायचा आहे त्या शाखेमध्ये त्यांना प्रवेश करता येत नाही.
त्यामुळे त्यांना ज्या शाखेमध्ये जायचे नाही त्या शाखेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो.
तुम्ही जर 11 वी मध्ये प्रवेश करणार असल्यास या बाबी लक्षात घ्या.
कधी कधी काय होते बरेच विद्यार्थी तो कॉलेज निवडतात किंवा पालक निवडण्यासाठी सांगतात जे त्यांना जवळ आहे. आणि त्या कॉलेज मध्ये जर तुमच्या आवडीचा विषय नसेल म्हणजे त्या कॉलेज मध्ये फक्त Science आणि Arts हे दोन विषय असतात. आणि तुमचे स्वप्न आहे की तुम्हाला CA बनायचे आहे.
मग विद्यार्थ्याकडे दोन पर्याय असते एक तर तुमचे स्वप्नाला विसरावे लागते. किंवा
तुमच्या स्वप्नाला फॉलो करत ज्या कॉलेज मध्ये कॉमर्स Commers विषय आहे. त्या कॉलेज मध्ये प्रवेश करणे.
प्रत्येक विद्यार्थ्याची ही वेगवेगळ्या विषयात आवड असते. त्यामुळे आपल्या आवडीचा विषय निवडणे आवश्यक असते.
कोणाला फॉलो करत बसू नका. जसे कोणी एखादा कोर्स केला आणि त्याला चांगला पगार मिळतो, आणि मलाही चांगला पगार मिळेल म्हणून तुम्ही तो कोर्स निवडतात परंतु त्या कोर्स मध्ये तुमची आवड नसते.
म्हणून ज्या मध्ये तुमची आवड आहे तोच कोर्स किंवा शाखा निवडा.