SVANidhi Yojna स्वानिधी योजना –
असा करा अर्ज
SVANidhi Yojna
Table of Contents
नमस्कार मित्रांनो, आपण मागील पोस्ट मध्ये SVANidhi Yojna स्वानिधी योजना विषयी माहिती पाहिली. त्यामध्ये आपण योजनेची सुरुवात कधी झाली, या योजनेची सुरुवात कोणी केली या विषयी माहिती पाहिली आहे.
ही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश काय आहे या विषयी माहिती दिली आहे.
आपण या मध्ये SVANidhi Yojna स्वानिधी योजना साठी अर्ज कसा करावा, कोणकोणती बँक या योजनेसाठी कर्ज देणार आहे या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.


कोणती बँक देणार स्वानिधी योजना साठी कर्ज
स्वानिधी या योजनेसाठी खालील बँका कर्ज देणार आहे –
- 01 ) अनुसूचित व्यावसायिक बँक
- 02) प्रादेशिक ग्रामीण बँक
- 03) लहान वित्त बँक
- 04) सहकारी बँक
- 05) बिगर बँकिंग वित्त कंपन्या
- 06) मायक्रो फायनान्स संस्था
- 07) SHG बँक
तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील बँका मध्ये जाऊन माहिती घेऊ शकता.
स्वानिधी योजना साठी कोणती पात्रता पाहिजे
ज्या रस्त्यावरील विक्रेत्याकडे रस्त्यावर विक्री करण्याचे प्रमाणपत्र आहे किंवा ओळखपत्र आहे असे विक्रेते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ज्या रस्त्यावरील विक्रेत्याचे सर्वेक्षण करताना ओळख झाली आहे परंतु त्यांच्या कडे विक्री करण्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र नाही असे विक्रेते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अशा सर्व रस्त्यावरील विक्रेत्यासाठी एक ओळखपत्र तयार करण्यात येईल.
ज्या विक्रेत्याकडे ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र नाही अश्या विक्रत्याला एक महिन्याचा कालावधी ओळखपत्र आणि प्रमाणपत्र काढण्यासाठी दिला जाईल.
हे ही वाचा –
SVANidhi Yojna स्वानिधी योजना –
स्वानिधी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- अर्ज करणाऱ्याचा आधार कार्ड
- बँक पासबुक
- लिंक असलेला मोबाईल नंबर
- मतदान कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
स्वानिधी योजनेसाठी अर्ज कसा करावा
देशामधील इच्छुक असलेले रस्त्यावरील आणि गल्ली मध्ये फळ विक्रेते यांना स्वानिधी या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजने अंतर्गत अर्ज करावा लागेल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या बँकेत ऑफलाईन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या.
सर्वात आणि अर्ज करण्यासाठी स्वानिधी योजनेच्या कर्यालाईन संकेतस्थळावर जावे लागेल. त्या मध्ये होम पेज ओपन होईल.
होम पेज ओपन झाल्यावर तेथे Planning to Apply for Loan असा ऑप्शन दिसेल.
ह्या वर क्लिक केल्यानंतर तेथे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील. ते ऑप्शन लक्ष पूर्वक वाचा आणि view more या ऑप्शन वर क्लिक करा.
त्यानंतर तेथे दुसरा पेज ओपन होईल तेथे तुम्हाला View / Download Form असा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शन वर क्लिक करून स्वाणिधी योजने साठी अर्ज करण्यासाठी फॉर्म ची PDF फाईल ओपन होईल.
तो फॉर्म डाऊनलोड करून घ्या.
तो फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्या मधील सर्व माहिती वाचा.
आणि त्यामधील सर्व माहिती योग्य ती वाचून अचूक भरावी.
सर्व माहिती भरल्यानंतर त्या फॉर्म सोबत तुमचे आवश्यक कागदपत्रे जोडावे.
सर्व कागदपत्रे जोडल्या नंतर तो फॉर्म दिलेल्या संस्था वर जाऊन जमा करावा.
कर्ज देणाऱ्या संस्था चे नावे असे पहा
स्वानिधी योजना च्या होम पेज वर गेल्यानंतर तेथे तुम्हाला सर्वात खाली View More असा ऑप्शन दिसेल.
यावर क्लिक केल्यानंतर दुसरे पेज ओपन होईल.
त्यामध्ये तुम्हाला Lenders List असा ऑप्शन दिसेल. त्या वर क्लिक करा.
यावर क्लिक केल्यानंतर दुसऱ्या पेज वर कर्ज देणाऱ्या बँक ( संस्था ) ची यादी दिसेल.
त्यानंतर तुम्ही इच्छुक असाल त्या बँके मध्ये अर्ज करू शकतात.
स्वनिधी योजना साठी असे लॉगिन करावे
स्वानिधी योजना साठी लॉगिन करण्यासाठी त्यांच्या कार्यालयीन संकेतस्थळावर जावे.
तेथे गेल्यानंतर त्यांचे होम पेज ओपन होईल.
तेथे तुम्हाला login असा ऑप्शन दिसेल.
त्या ऑप्शन वर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे विविध श्रेणी दिसेल.
तुमच्या श्रेणी नुसार क्लिक करा.
त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये युजर नेम आणि पासवर्ड टाका.
त्यानंतर लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.
या प्रकारे तुमचे लॉगिन झाले.
आपले ॲप्लिकेशन स्टेटस असे चेक करा
ॲप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी स्वानिधी योजना च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
त्यानंतर तुमच्या पुढे होम पेज ओपन होईल.
त्यावर तुम्हाला Know Your Application Status असा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शन वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल.
त्यामध्ये तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.
मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल.
तो आलेला OTP टाकायचा आहे.
आणि सर्च या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन स्टेटस तुमच्या पुढे दिसेल.