लाडक्या बहिणींसाठी नवीन GR निघाला, 3 सिलेंडर मोफत मिळणार Annapurna Yojana
नमस्कार मित्रांनो, Annapurna Yojana गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटींच्या जवळपास महिलांनी अर्ज केलेले आहेत.

आता या योजनेमध्ये सरकारने नवीन एक GR लागू केला आहे. या GR मध्ये असे आहे की, ज्या महिलांना माझी लाडकी बहिण योजना (mazi ladki bahin yojna) या योजनेचा लाभ मिळणार आहेत, अशा महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
आपण या मध्ये या विषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Annapurna Yojana
महाराष्ट्रात आता लाडकी बहीण योजनेनंतर आणखी एका नवीन मोठ्या योजनेची सुरुवात झालेली आहे. या योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना देखील मिळणार आहे.
याच्या माध्यमातून पात्र महिलांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील उज्वला योजनेच्या 52 लाखाहून अधिक महिलांना आणि ज्या महिला लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र ठरतील अशा महिलांच्या कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.
👉👉फक्त या महिलांना मिळणार या योजनेचा लाभ 👈👈
काय आहेत या योजेच्या अटी ?
या योजनेचा लाभ राज्यातील उज्वला योजनेच्या आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील रेशन कार्ड नुसार एक लाभार्थी यासाठी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. या योजनेचा लाभ फक्त घरगुती गॅस म्हणजे 14.2 किलो वजनी गॅस जोडणी असणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ एक जुलै 2024 पूर्वी रेशन कार्ड बनवलेल्या पात्र महिलांनाच दिला जाणार आहे. ज्यांनी 01 जुलै 2024 नंतर रेशन कार्ड काढले असतील तर अशा महिला या योजनेसाठी अपात्र राहणार आहेत. या योजनेअंतर्गत एका वर्षाला फक्त तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.
कसा मिळणार या योजनेचा लाभ
उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्राकडून तीनशे रुपये अनुदान मिळते. हे अनुदानाचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते. आता राज्य शासनाच्या माध्यमातून एका वर्षात 3 सिलेंडर साठी उर्वरित 530 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
दुसरीकडे लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडरचे पैसे थेट बँक खात्यात दिले जाणार आहेत. प्रति सिलेंडर 830 रुपये प्रमाणे ही रक्कम थेट सदर पात्र महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
