Biomass stove yojna
मोफत निर्धुर चूल वाटप योजना – असा करा अर्ज
Biomass stove yojna
Biomass stove yojna महात्मा ज्योतिबा फुले नाविनिकरणीय ऊर्जा व प्रौद्योगिकी मर्यादित यांच्या अंतर्गत निर्धुर चुलीचे वाटप करण्यात येणार आहे. धुरामुळे होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात ही योजना सुरू आहे.

कोण या योजनेसाठी पात्र आहेत.
- महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामधील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्ज करणारा अर्जदार हा अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे LPG गॅस कनेक्शन नसावे.
- अर्जदार हा दारिद्य्र रेषेखाली असावा.
हे ही वाचा 👇
Swadhar Yojana – विद्यार्थ्यांना मिळणार 50,000 हजार रुपये – असा करा अर्ज
PM KISAN YOJNA – हे करा काम या शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये
Indian Air Force Recruitment 2022 भारतीय हवाई दलात विविध पदांची भरती
Biomass stove yojna online apply
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
महाराष्ट्र राज्यातील सर्व इच्छुक असलेले अर्जदार 15 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
असा करा अर्ज
अर्ज करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या.
- अर्ज करण्यासाठी अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
- त्यानंतर तेथे तुम्हाला अर्ज करण्याचा फॉर्म दिसेल.
- त्या फॉर्म मध्ये सुरुवातीला तुमचे आधार कार्ड नुसार नाव टाकावे.
- त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक आहे तो मोबाईल नंबर येथे टाकावा.
- त्यानंतर तुमचा पत्ता टाकावा.
- त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा टाकावा.
- जिल्हा टाकल्यानंतर तुमचा तालुका निवडावा.
- तुमच्याकडे जर LPG गॅस कनेक्शन असेल तर Yes हा पर्याय निवडावा. आणि नसेल तर NO हा पर्याय निवडावा.
- तुमची जर SC कास्ट असेल तर त्या ठिकाणी Yes हा पर्याय निवडावा. आणि दुसरी कास्ट असेल तर NO हा पर्याय निवडावा.
- आणि Submit या पर्यायावर क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा