केंद्र सरकारी कंपनीत नोकरीची संधी! BEL मध्ये 350 पदांची भरती जाहीर BEL Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, BEL Bharti 2026 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपनीमध्ये प्रोबेशनरी इंजिनिअर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीद्वारे इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल विभागातील एकूण 350 पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
BEL Bharti 2026
थोडक्यात माहिती
- संस्थेचे नाव – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)
- भरतीचे नाव – BEL Recruitment 2026
- एकूण जागा – 350
- पदाचे नाव – प्रोबेशनरी इंजिनिअर
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्जाची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2026
पदानुसार रिक्त जागांचा तपशील –
या भरतीमध्ये खालील दोन विभागांसाठी पदे उपलब्ध आहेत.
- 1. प्रोबेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) – 200 जागा
- 2. प्रोबेशनरी इंजिनिअर (मेकॅनिकल) – 150 जागा
- एकूण जागा – 350
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
1. इलेक्ट्रॉनिक्स विभाग –
B.E./B.Tech/B.Sc Engineering मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्युनिकेशन किंवा टेलिकम्युनिकेशन विषयातील प्रथम श्रेणीतील पदवी आवश्यक आहे.
2. मेकॅनिकल विभाग –
B.E./B.Tech/B.Sc Engineering मध्ये मेकॅनिकल विषयातील प्रथम श्रेणीतील पदवी आवश्यक आहे.
SC/ST/PWD उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रतेमध्ये उत्तीर्ण श्रेणी ग्राह्य आहे.
वयोमर्यादा –
1 ऑक्टोबर 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
- SC/ST उमेदवार – 5 वर्षे सूट
- OBC उमेदवार – 3 वर्षे सूट
अर्ज शुल्क –
- General/OBC/EWS उमेदवार – 1,180 रुपये
- SC/ST/Ex-Servicemen/PWD उमेदवार – शुल्क नाही.
निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड प्रक्रिया आणि परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे ही वाचा
अर्ज कसा करावा?
BEL भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- 1. सर्वप्रथम BEL च्या अधिकृत अर्ज पोर्टलला भेट द्या.
- 2. भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात वाचा.
- 3. ऑनलाइन अर्जामध्ये विचारलेली माहिती भरा.
- 4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- 5. लागू असल्यास अर्ज शुल्क भरा.
- 6. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट किंवा PDF जतन करून ठेवा.
महत्त्वाच्या तारखा –
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात – अधिकृत पोर्टलवर तपासा.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2026.
- अर्जाची अंतिम वेळ – रात्री 11:59 वाजेपर्यंत.
- परीक्षेची तारीख – अद्याप जाहीर नाही.
अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा
महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीमधील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि इतर अटी तपासून घ्याव्यात.
अशाच नवीन सरकारी नोकरीच्या माहितीसाठी नियमितपणे naukarikida.in ला भेट द्या.
