बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची मोठी भरती Bank of Baroda LBO Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, Bank of Baroda LBO Bharti 2026 बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) कडून Local Bank Officer (LBO) पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 2,482 पदे भरली जाणार आहेत.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 आहे.
बँक ऑफ बडोदा LBO भरती 2026 – थोडक्यात माहिती –
- भरतीचे नाव: Bank of Baroda LBO Recruitment 2026
- पदाचे नाव: Local Bank Officer (LBO)
- एकूण जागा: 2,482
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
- अनुभव: 1 वर्ष
- वयोमर्यादा: 21 ते 30 वर्षे
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- अर्जाची अंतिम तारीख: 7 सप्टेंबर 2026
पदाचे नाव आणि रिक्त जागा –
या भरतीमध्ये Local Bank Officer (LBO) या पदासाठी एकूण 2,482 जागा उपलब्ध आहेत.
शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला 1 वर्षाचा संबंधित अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2026 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत देण्यात आली आहे.
- SC/ST: 5 वर्षे सवलत
- OBC: 3 वर्षे सवलत
अर्ज शुल्क –
अर्ज करताना उमेदवारांना प्रवर्गानुसार शुल्क भरावे लागेल.
- General/OBC/EWS: ₹850
- SC/ST/PwD/Ex-Servicemen/महिला: ₹175
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची संधी मिळणार आहे.
आजची चालू भरती
सरकारी नोकरी! चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती CPCL Bharti 2026
मोठी भरती! SBI मध्ये तब्बल 10,000+ पदांची भरती SBI Clerk Bharti 2026
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी! BMC मध्ये विविध पदांची भरती BMC Apprentice Bharti 2026
अर्ज करण्याची अंतिम तारीख –
Bank of Baroda LBO भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकर अर्ज करणे योग्य ठरेल.
परीक्षा कधी होणार?
या भरतीची परीक्षा कधी घेतली जाईल याबाबतची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल.
अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी Bank of Baroda LBO भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपली पात्रता तपासावी.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी योग्य पद्धतीने अपलोड करून अर्ज शुल्क भरावे.
महत्त्वाच्या तारखा –
- ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख – 7 सप्टेंबर 2026
- परीक्षा – नंतर जाहीर करण्यात येईल.
बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी Bank of Baroda LBO Recruitment 2026 ही चांगली संधी आहे. 2,482 जागा असल्यामुळे पात्र उमेदवारांनी या भरतीची माहिती तपासून वेळेत ऑनलाइन अर्ज करावा.
टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि इतर सर्व अटी तपासणे आवश्यक आहे.
अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा
