सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची संधी AFCAT 2027
नमस्कार मित्रांनो, AFCAT 2027 भारतीय हवाई दलामध्ये (Indian Air Force) अधिकारी पदावर नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलामार्फत AFCAT 01/2027 अंतर्गत एकूण 284 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
AFCAT 2027
या भरतीद्वारे फ्लाइंग ब्रांच, ग्राउंड ड्युटी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा विविध विभागांमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख याबद्दलची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
भारतीय हवाई दल भरती 2027 – संपूर्ण माहिती
- भरतीचे नाव: AFCAT 01/2027
- संस्थेचे नाव: भारतीय हवाई दल (Indian Air Force)
- एकूण पदे: 284
- पदाचे नाव: कमिशन्ड ऑफिसर
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज पद्धती: ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026
- परीक्षेची तारीख: 31 जानेवारी 2027
पदांचे नाव आणि जागांचा तपशील –
या भरतीमध्ये विविध विभागांसाठी पदे उपलब्ध आहेत.
- फ्लाइंग ब्रांच – 36 जागा
- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) – 124 जागा
- ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) – 108 जागा
- GATE स्कोअर एंट्री (टेक्निकल) – 16 जागा
NCC स्पेशल एंट्रीसाठी फ्लाइंग ब्रांचमध्ये नियमानुसार 10% जागांची तरतूद आहे.
शैक्षणिक पात्रता –
1. फ्लाइंग ब्रांच:
- उमेदवार 12वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह किमान 60% गुणांनी उत्तीर्ण असावा. तसेच कोणत्याही शाखेतील पदवी किंवा BE/B.Tech मध्ये किमान 60% गुण आवश्यक आहेत.
2. ग्राउंड ड्युटी (टेक्निकल):
- 12वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह किमान 50% गुण आणि BE/B.Tech मध्ये किमान 60% गुण आवश्यक आहेत.
3. ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल):
- कोणत्याही शाखेतील पदवीमध्ये किमान 60% गुण आवश्यक आहेत. B.Com, BBA, BMS, BBS, CA, CMA, CS, CFA किंवा B.Sc (Finance) पात्रताधारक उमेदवारही अर्ज करू शकतात. संबंधित अटी लागू राहतील.
4. NCC स्पेशल एंट्री:
- NCC Air Wing Senior Division चे C प्रमाणपत्र आवश्यक आहे.
5. GATE स्कोअर एंट्री:
BE/B.Tech पदवी आणि आवश्यक GATE पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
वयाची अट 01 जानेवारी 2028 रोजी खालीलप्रमाणे आहे.
- फ्लाइंग ब्रांच: 20 ते 24 वर्षे
- ग्राउंड ड्युटी टेक्निकल: 20 ते 26 वर्षे
- ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल: 20 ते 26 वर्षे
वयासंबंधी सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
आजची चालू भरती
12 वी पास वर इंडियन ऑइलमध्ये विविध पदांसाठी भरती IOCL Apprentice Bharti 2026
सरकारी नोकरीची संधी NLC मध्ये विविध पदांची भरती NLC India Bharti 2026
12 वी पास वर इंडियन ऑइलमध्ये विविध पदांसाठी भरती IOCL Apprentice Bharti 2026
अर्ज शुल्क –
- AFCAT एंट्री: 550 रुपये + GST
- NCC स्पेशल एंट्री: शुल्क नाही
- GATE स्कोअर एंट्री: शुल्क नाही
महत्त्वाच्या तारखा –
- ऑनलाइन अर्ज सुरू: अधिकृत पोर्टलवरील वेळापत्रकानुसार
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026
- AFCAT परीक्षा: 31 जानेवारी 2027
अर्ज कसा करावा?
- 1. सर्वप्रथम भारतीय हवाई दलाच्या अधिकृत AFCAT वेबसाइटला भेट द्या.
- 2. AFCAT 01/2027 भरतीची लिंक उघडा.
- 3. नवीन नोंदणी करून आवश्यक माहिती भरा.
- 4. अर्जामध्ये वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
- 5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- 6. लागू असल्यास अर्ज शुल्क भरा.
- 7. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट किंवा PDF जतन करा.
अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा
