सरकारी शिक्षक होण्याची संधी! राज्यात शिक्षकांच्या तब्बल 30,000+ जागा! Maharashtra Shikshak Bharti 2026
नमस्कार मित्रांनो , Maharashtra Shikshak Bharti 2026 महाराष्ट्रातील शिक्षक पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्रात शिक्षक भरती 2026 अंतर्गत एकूण 30,209 शिक्षक पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आदिवासी विकास विभाग तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमधील पदांचा समावेश आहे.
उमेदवारांना पवित्र पोर्टलवर उपलब्ध असलेल्या संधींनुसार पसंतीक्रम नोंदवून लॉक करायचा आहे. पसंतीक्रम नोंदविण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2026 आहे.
महाराष्ट्र शिक्षक भरती 2026 – थोडक्यात माहिती
- भरतीचे नाव: महाराष्ट्र शिक्षक भरती 2026
- पदाचे नाव: शिक्षक / शिक्षण सेवक
- एकूण जागा: 30,209
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज/प्रक्रिया: ऑनलाइन
- पसंतीक्रमाची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2026
- वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांना: 5 वर्षांची सूट
एकूण किती जागा आहेत?
महाराष्ट्र शिक्षक भरतीमध्ये वर्गानुसार रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- इयत्ता 1ली ते 5वी – 14,320 जागा
- इयत्ता 6वी ते 8वी – 10,012 जागा
- इयत्ता 9वी ते 10वी – 5,513 जागा
- इयत्ता 11वी ते 12वी – 364 जागा
- एकूण – 30,209 जागा
कोणत्या संस्थांमध्ये शिक्षकांची भरती होणार?
या भरतीमध्ये विविध व्यवस्थापनांच्या शाळांमधील पदांचा समावेश आहे.
- जिल्हा परिषद – 13,351 जागा
- नगरपालिका / नगरपरिषद – 280 जागा
- महानगरपालिका – 1,954 जागा
- आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा – 2,421 जागा
- शासकीय विद्यानिकेतन – 56 जागा
- खासगी शैक्षणिक संस्था – 12,148 जागा
यापैकी 19,881 पदे मुलाखतीशिवाय तर 10,328 पदे मुलाखतीसह आहेत.
शैक्षणिक पात्रता –
इयत्ता 1ली ते 5वी
- या पदांसाठी शासनाच्या नियमानुसार D.Ed./D.El.Ed./B.Ed., तसेच TAIT 2025 आणि महाराष्ट्र TET यापैकी लागू पात्रता आवश्यक आहे.
इयत्ता 6वी ते 8वी
- या पदांसाठी D.Ed./D.El.Ed./B.Ed., TAIT 2025 आणि महाराष्ट्र TET आवश्यक आहे.
इयत्ता 9वी ते 10वी
- संबंधित विषयातील पदवी आणि B.Ed. तसेच TAIT 2025 आवश्यक आहे. महाराष्ट्र TET किंवा इतर पात्रता अधिकृत जाहिरातीनुसार लागू असल्यास आवश्यक असेल.
इयत्ता 11वी ते 12वी
संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि B.Ed. तसेच TAIT 2025 आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
महाराष्ट्र शिक्षक भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात आली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पवित्र पोर्टल TAIT 2025 टप्पा-1 अंतर्गत उमेदवारांना 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत पसंतीक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
आजची चालू भरती
मोठी भरती! रेल्वेमध्ये विविध पदांची भरती! Central Railway Bharti 2026
बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती Bank of Baroda Bharti 2026
सरकारी नोकरी! तरुण उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी संधी RCFL MT Bharti 2026
महत्त्वाची तारीख –
पसंतीक्रम नोंदवून लॉक करण्याची अंतिम तारीख – 11 ऑगस्ट 2026
त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता आपला पसंतीक्रम वेळेत नोंदवून लॉक करणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा
