SVANidhi Yojna स्वानिधी योजना – 

सुरुवात, उद्देश, असा करा ऑनलाईन अर्ज

 

SVANidhi Yojna

 

नमस्कार मित्रांनो, आपण या मध्ये SVANidhi yojna स्वनिधी योजना विषयी माहिती पाहणार आहोत. स्वानिधि या योजनेची सुरुवात 2020 साली करण्यात आली.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे स्ट्रीट वेंडर ( रस्त्यावरचे छोटे फळ- भाजी विक्रेते ) यांना फळ – भाजी चे दुकान टाकण्यात मदत होईल. आणि त्यांचे आर्थिक विकास होईल या साठी स्वनिधि योजनेची सुरुवात करण्यात आली.

SVANidhi Yojna
SVANidhi Yojna

 स्वानिधी योजनेची सुरुवात

01 जून 2022 रोजी मा. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कॅबिनेट बैठक पार पडली.

या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. सन 2019 मध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतामध्ये कोरोना चा गतीने फैलाव झाला. यामुळे देशामध्ये सर्व ठिकाणी जमाव बंदी, वाहतूक आणि बाजार पेठा अश्या अनेक ठिकाणी कोरोनाचा फैलावं रोकण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले.

हे ही वाचा :

Atal Pension yojana 2022 , अटल पेन्शन योजना काय आहे जाणून घ्या .

यामुळे फळ – भाज्या विक्रेते यांच्या धंद्यांवर खूप मोठा परिणाम झाला. तर काहींची दुकाने बंद पडली. यामुळे त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी स्वानीधी योजना SVANidhi Yojna ची सुरुवात करण्यात आली.

 

स्वानिधी योजना ची रक्कम

 

SVANidhi Yojna स्वानिधी योजने अंतर्गत 8100 करोड रुपयेचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या योजनेची सुरुवातीला रक्कम 5000 करोड रुपये होती. या योजने अंतर्गत 1.2 करोड नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे.

25 एप्रिल 2022 पर्यंत या योजने अंतर्गत 31.9 लाख रुपये कर्ज स्वीकारण्यात आले आहे.

ज्यामध्ये 2931 करोड रुपये 29.6 लाख लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त दुसरे 2.3 लाख कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

ज्यामध्ये 1.9 लाख कर्ज च्या माध्यमातून 385 करोड रुपये लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली आहे.

जे रस्त्यावरील विक्रेते आहेत त्यांनी आतापर्यंत 13.5 करोड रुपयांहून अधिक डिजिटल व्यवहार केले आहे.

ज्यामधून त्यांना 10 करोड रुपयांपर्यंत कश बॅक देण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त आता पर्यंत 51 करोड रुपये व्याज अनुदान देण्यात आला आहे.

या योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार दुसऱ्या योजनेचा लाभ 

 

SVANidhi Yojan स्वानिधी योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या मध्ये देशातील 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील 126 शहरामध्ये स्वनीधी योजनेची सुरुवात करण्यात आली.

या योजने अंतर्गत देशातील लाखो गली-गली मधील फळ विक्रेते आणि रस्त्यावरील फळ विक्रेते यांच्या परिवारातील लोकांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा दिली जाते.

या योजने अंतर्गत लाभार्थ्याला दुसऱ्या योजनेचा लाभ मिळतो. त्यामध्ये जीवन ज्योती विमा, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जन धन योजना अश्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

आता या योजनेचा कालावधी हा डिसेंबर 2024 पर्यंत करण्यात आला आहे.

 

असा करा अर्ज क्लिक करा 👈

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *