Career After Matric
या शाखेमध्ये करा प्रवेश…!
10 वी नंतर काय करावे…?
Career After Matric

नमस्कार मित्रांनो, सध्याच्या काळात प्रत्येक दहावी उत्तीर्ण Career After Matric झालेल्या विद्यार्थ्यांना एकच प्रश्न पडलेला असतो, ते म्हणजे 10 वी नंतर काय करावे..?
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या करिअर बाबत खूप गंभीर असतात.
त्यांच्या मनात एकच शंका असते ते म्हणजे दहावी नंतर काय करावे..? दहावी नंतर कोणत्या शाखेमध्ये प्रवेश करावा..? दहावी नंतर कोणता विषय निवडावा..?
आपण या मध्ये 10 वी नंतर चे सर्व शाखा त्या मधील मिळणारी नोकरी या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Career After Matric
दहावी झाल्यानंतर विद्यार्थी या शाखेमध्ये प्रवेश घेऊ शकतात.
Click here 👇
Career After Matric 10 वी नंतर काय करावे…?
विज्ञान ( Science ) –
11 वी मध्ये प्रवेश घेताना सायन्स ( Science ) या शाखेमध्ये प्रवेश घेणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बऱ्याच विद्यार्थ्याला सायन्स ( Science ) या विषयाची आवड असते.
विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकाला वाटते की त्यांच्या मुलाने सायन्स या शाखेमध्ये प्रवेश घ्यावा.
सायन्स या शाखेमध्ये प्रवेश घेण्याचा एक मोठा फायदा असा आहे की, जर विद्यार्थ्याला 11 वी नंतर जर शाखा बदलायची असेल तेव्हा ते बदलू शकतात. किंवा जर विद्यार्थ्याला बारावी नंतर आर्ट्स ( Arts ) किंवा कॉमर्स ( Commerce )
या शाखेतून पदवी प्राप्त करायची असेल तर ते त्यामधून पदवी घेऊ शकतात.
तुम्ही दुसऱ्या कोणत्याही शाखेतून शाखा बदलू शकत नाही. ही सुविधा फक्त सायन्स या शाखेमध्ये आहे.
सायन्स या मधील विषय
- English इंग्रजी
- Mathematics गणित
- Biology जीवशास्त्र
- Botany वनस्पतिशास्त्र
- Zoology प्राणीशास्त्र
- Physics भौतिकशास्त्र
- Chemistry रसायनशास्त्र
- Science विज्ञान
सायन्स या शाखेमधून ह्या नोकऱ्या मिळतात.
- डॉक्टर ( Doctor )
- इंजीनियर ( Engineer )
- आयटी ( IT )
- संशोधन (Research Centre )
- विमानचालन (Poilot )
- मर्चंट नेव्ही ( Merchant Navy )
- फॉरेन्सिक विज्ञान ( Forensic Science )
- नैतिक हॅकिंग ( Hacking )
Career After Matric
कॉमर्स ( Commerce )
सायन्स या शाखे नंतर दुसरी लोकप्रिय शाखा म्हणजे कॉमर्स. जर तुमची आवड बिजनेस ( व्यवसाय ),अकाऊंटिंग आणि अर्थशास्त्र मध्ये असेल तर तुम्ही या शाखेमध्ये प्रवेश घेऊ शकता.
कॉमर्स या शाखेतून ह्या नोकऱ्या मिळतात.
- अकाउंटेंट अकाउंटंट ( Accountant )
- कंपनी सेक्रेटरी ( Company Secretary )
- एमबीए (MBA)
- फाइनेंशियल प्लानर ( Financial Planner )
- मैनेजमेंट अकाउंटिंग ( Management Accounting )
- चार्टर्ड अकाउंटेंट (CA)
- एक्चुअरीज ( Actuaries )
कॉमर्स या शाखेमधील विषय
- अकाउंटन्सी
- व्यवसाय अभ्यास
- अर्थशास्त्र
- इंग्रजी
- माहिती सराव / गणित
आर्ट्स ( Arts )
आर्ट्स ( कला ) या शाखेबाबत काही लोकांना अशी शंका असते, जे विद्यार्थी अभ्यासामध्ये कमकुवत असतात, ज्यांना दहावी मध्ये कमी मार्क्स मिळाले असतात तेच विद्यार्थी आर्ट्स ( कला ) ही शाखा निवडतात.
परंतु असे नाही जे विद्यार्थी अभ्यासामध्ये हुशार आहेत, ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क मिळाले ते विद्यार्थी पण आर्ट्स या शाखेमध्ये प्रवेश घेतात.
जे विद्यार्थ्याला सरकारी नोकरी पाहिजे अशा विद्यार्थ्यासाठी आर्ट्स हा खूप चांगला मार्ग आहे.
कारण सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षा घेतात त्या सर्व अभ्यासक्रमात आर्ट्स ( कला ) या शाखेतील विषय असतात. त्यामध्ये UPSC, SSC,MPSC,BPSC, इत्यादी मध्ये या मधील विषय असतात.
आर्ट्स या शाखेमधिल विषय
- इतिहास
- राज्यशास्त्र
- समाजशास्त्र
- अर्थशास्त्र
- भूगोल
- मानसशास्त्र
- इंग्रजी
- प्रादेशिक भाषा
सरकारी नोकरी व्यतिरिक्त दुसऱ्या नोकऱ्या मिळतात. त्यामध्ये
- पत्रकार (Journalist)
- ग्राफिक डिझायनर (Graphic Designer)
- वकील ( Lawyer )
- कार्यक्रम व्यवस्थापक (Event Manager )
- शिक्षक ( Teacher )
आर्ट्स ( कला ) या शाखेमध्ये एकच अडचण येते ती म्हणजे जर विद्यार्थ्याला बारावी नंतर दुसऱ्या शाखेमधुन पदवी प्राप्त करायची असल्यास तेव्हा त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या शाखेमध्ये प्रवेश घेता येत नाही.
पॉलीटेक्निक (Polytechnic) कोर्स
विद्यार्थ्याला दहावी नंतर जर 11 वी मध्ये प्रवेश घ्यायचा नसेल तर त्या साठी पॉलीटेक्निक हा कोर्स खूप चांगला आहे. या कोर्स चा कालावधी हा 3 वर्षाचा असतो.
पॉलीटेक्निक हा कोर्स पूर्ण टेक्निकल असतो त्यामुळे या मध्ये नोकरी मिळण्याची जास्त शक्यता असते.
लवकर इंजिनीयर बनायचे असेल तर पॉलीटेक्निक हा कोर्स अधिक चांगला आहे.
पॉलीटेक्निक मधील हे काही प्रमुख कोर्स आहेत.
- मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा
- डिप्लोमा इन ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग
- जैवतंत्रज्ञान अभियांत्रिकी डिप्लोमा
- इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा
- सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
- डिप्लोमा इन केमिकल इंजिनीअरिंग
- डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी
पॉलीटेक्निक कोर्स पूर्ण केल्यानंतर जर तुम्हाला पुढे शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही B.Tech करू शकता.
आयटीआय ( ITI )
आय टी आय म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( Industrial Training Institutes ). विद्यार्थी हे सरकारी किंवा खासगी या दोन्ही पैकी कोणत्याही संस्थेमध्ये कोर्स करू शकतात. ITI साठी उमेदवाराची निवड ही त्यांच्या दहावी च्या गुणांवर केली जाते.
जर विद्यार्थ्याला 10 वी नंतर लगेच नोकरी पाहिजे असेल तर ते ITI करू शकतात.
आयटी आय हा 1 ते 3 वर्षापर्यंत असतात.
Career After Matric
नोकरी ( Job )
जर विद्यार्थ्याला पुढील शिक्षण घ्यायचे नसेल तर ते दहावी नंतर नोकरी करू शकतात. त्यांना दहावी वर सरकारी आणि खासगी या दोन्ही मध्ये नोकरी मिळू शकते.
खासगी मध्ये त्यांना क्लर्क, डाटा एंट्री ऑपरेटर, इत्यादी प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात.
आणि सरकारी मध्ये खालील नोकऱ्या मिळू शकतात.
- भारतीय सैन्य
- भारतीय नौदल
- भारतीय हवाई दल
- बीएसएफ
- भारतीय रेल्वे
- पोस्ट ऑफिस
जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर जे दहावी उत्तीर्ण झालेत किंवा जे दहावी मध्ये आहेत त्यांना ही पोस्ट शेअर करा.
कारण त्यांना ही दहावी नंतर काय करावे हे समजत नसेल तर ही पोस्ट वाचून ते अचूक निर्णय घेतील.