1 ऑगस्ट पासून बदलणार हे नियम सर्वसामान्य लोकांच्या खिशाला लागणार कात्री Inflation will increase

 

Inflation will increase

नमस्कार मित्रांनो, Inflation will increase केंद्र सरकारने नुकताच आर्थिक वर्ष 2024-2025 साठीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. अशातच आता जुलै महिना संपत आला असून, ऑगस्ट महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ज्यामुळे नेहमी प्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या नियमांतील बदलानुसार काही वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, 1 ऑगस्ट 2024 पासून नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे.

Inflation will increase

1 ऑगस्टपासून होणार हे बदल –

1. गॅस सिलिंडरचे दर

नियमानुसार, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर निश्चित केले जातात. गेल्या महिन्यात सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या. त्यानुसार आता पुन्हा 1 ऑगस्ट रोजी व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या जातील. यावेळीही सरकार गॅस सिलिंडरचे दर कमी करते की त्यात वाढ होते? याकडे लक्ष लागून आहे.

2. गुगल मॅप नियम बदलणार –

भारतात गुगल मॅपने देखील काही नियमात बदल केले असून, हे बदल 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. त्यानुसार, कंपनीने आपल्या सेवांचे शुल्क 70 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. याशिवाय Google Maps या सेवेसाठी डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये शुल्क आकारले जाणार आहे.

3. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड –

1 ऑगस्ट 2024 पासून एचडीएफसी बँकेकडून टाटा न्यू इन्फिनिटी आणि टाटा न्यू प्लस क्रेडिट कार्ड्समध्ये बदल होतील. या कार्डधारकांना टाटा न्यू यूपीआय आयडी वापरून व्यवहारांवर 1.5 टक्के न्यूकॉईन्स मिळतील.

4. ईएमआय प्रक्रिया शुल्क –

नवीन नियमांनुसार, उशीरा पेमेंट टाळण्यासाठी सुलभ हप्त्यांची सुविधा देखील उपलब्ध होईल. मात्र, यासाठी ग्राहकांना 299 रुपयांपर्यंतचे ईएमआय प्रोसेसिंग चार्ज द्यावा लागेल. एचडीएफसी बँकेच्या मते, हे शुल्क जीएसटी अंतर्गत आहे. तुम्ही या बँकेतूनही थर्ड पार्टी पेमेंट ॲप्सद्वारे पेमेंट केल्यास, तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी 1 टक्के शुल्क द्यावे लागेल.

हे ही वाचा 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पात्र यादी जाहीर, येथे पाहा पात्र यादी mazi ladki bahin yojna list

मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण अडचणीत अर्थ विभागाचे आक्षेप, बहिण नाराज होणार ! Mazi Ladki Bahin Yojana new update

आपल्या गावातील घरकुल यादी आली- तुमचे नाव आहे का ? Pradhan Mantri Aawas Yojana 2024

5. यूटिलिटी व्यवहार –

एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे वीज बिल, भाडे आणि इतर उपयुक्तता व्यवहारांशी संबंधित नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. हे बदल भाडे, शिक्षण आणि युटिलिटी बिलांसाठी थर्ड पार्टी ॲप्सद्वारे केलेल्या व्यवहारांसह विविध व्यवहारांवर परिणाम करतील.

1 ऑगस्टपासून, CRED, PayTM, Cheq, MobiKwik आणि Freecharge सारख्या थर्ड पार्टी ॲप्सद्वारे HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या सर्व भाडे व्यवहारांवर व्यवहाराच्या रकमेवर 10 टक्के शुल्क आकारले जाईल.

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *