पीएम आवास योजनेत झाले नवीन बदल, यांना देखील मिळणार घर PM Awas Yojana

 

29/08/2024, Created By Manoj S

 

नमस्कार मित्रांनो, PM Awas Yojana केंद्र आणि राज्य सरकार हे कोणत्याही माध्यमातून गरीब आणि गरजू नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित असतात. तशीच एक गरीब लोकांना घर मिळवून देण्यासाठी सरकारने PM Awas Yojana राबविली आहे.

PM Awas Yojana

PM Awas Yojana

या योजने अंतर्गत गरीब आणि गरजू लोकांना घर बांधण्यासाठी पैसे देण्यात येते. मानवाच्या मूलभूत गरजा पाहिल्या तर यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गरजा खूप महत्त्वाच्या आहेत. आवास योजनेत देशातील ग्रामीण,शहरी भागातील नागरिकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर असावे यासाठी ही योजना राबवली आहे.

आपल्या गावातील घरकुल यादी आली- तुमचे नाव आहे का ? Pradhan Mantri Aawas Yojana 2024

PM आवास योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी नागरिकांना आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व नियम आहेत. फक्त पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

या योजनेमधील नियमांमध्ये सरकारने एक महत्त्वाच्या बदल केला आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळावा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे या साठी हा बदल करण्यात आलेला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना 2024

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण ची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येते.

या योजनेमध्ये जर अर्जदाराचे मासिक उत्पन्न 10000 रुपये असेल व त्याच्या घरी लँडलाईन फोन किंवा दुचाकी, असेल तर अशा लोकांना या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळत नव्हता. परंतु आता या नियमांमध्ये बदल केला आहे. या आधी जर तुमच्या कडे हे सर्व असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरविले जात होते.

परंतु आता या योजने मधील नियमांमध्ये बदल केले आहे, जर एखाद्या अर्जदाराचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये असेल तसेच अर्जदाराच्या घरी लँडलाईन फोन असेल किंवा संबंधित अर्जदाराच्या घरी दुचाकी, फ्रिज असले तरी त्याचा अर्ज आता पात्र म्हणजेच ग्राह्य धरला जाणार आहे.

हे ही वाचा

अशा पद्धतीने करा राशन कार्ड ची E-KYC होणार नाही रेशन कार्ड बंद Ration Card e-KYC Process

राशन कार्ड ची नवीन यादी आली तुमचे नाव यादी मध्ये आहे का..? Ration card list

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *