नागरीकांच्या अडचणी वाढणार? आधार कार्ड संबंधीत नवीन नियम लागू Aadhar Card Rule

 

28/08/2024, Created By Manoj S

 

नमस्कार मित्रांनो, Aadhar Card Rule आधार कार्ड हा भारतात सध्या सगळ्यात महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. मोबाइलच्या सिमकार्डपासून ते बॅंकेच्या लोनपर्यंत आणि शाळेतल्या प्रवेशापासून ते सरकारी योजनेच्या लाभांपर्यंत सगळीकडे आधार कार्ड देणे आवश्यक आहे.

Aadhar Card Rule

Aadhar Card Rule

आधार कार्डावर कोणतेही माहिती बदलायच्या प्रक्रियेत सरकारकडून आता बदल करण्यात आलेले आहेत. UIDAI Aadhar Card च्या ऑफिशियल वेबसाईटसवर याविषयी माहिती दिली आहे.

भारत सरकारने आधार कार्डविषयी नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता आधार कार्डावरील नाव आणि जन्मतारीख यात बदल करणे आता आणखी अवघड झालेले आहे. यापूर्वी आधार कार्डवरील नाव आणि जन्मतारीख बदलणं सहज शक्य होतं. आता ती प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे ज्यांचं नाव आणि जन्मतारीख आधार कार्डावर नोंदवताना काही चूक झाली आहे, त्यांच्यासाठी ती चूक सुधारणं डोकेदुखी ठरणार आहे.

Aadhar Card Update

जर तुमचे आधार कार्डावरील जन्मतारीख किंवा नाव चुकलेले  असेल आणि ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला तुमचे बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल सर्टिफिकेट जोडणं आवश्यक असणारं आहे. यापूर्वी असं कोणतंही कागदपत्र न सादर करताही अशा चुका दुरुस्त करता येत होते. आता नियमांमध्ये कडक बदल करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागात अनेक महिलांकडे जन्माचा दाखला किंवा स्कूल सर्टिफिकेट नसण्याची शक्यता आहे. अशा वेळी त्यांना आधार कार्डावरची माहिती अपडेट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

नवीन सदस्याचे नाव घरी बसून राशन कार्डवर टाका Ration Card New Member Add

ज्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल सर्टिफिकेट नाही त्यांच्यासाठी आधार कार्डावरची माहिती अपडेट करणं ही डोकेदुखी होणार आहे. त्यांना MBBS डॉक्टरने अटेस्टेड केलेलं पत्र किंवा गॅझेटेड अधिकाऱ्याने अटेस्टेड केलेलं पत्र जोडणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रं नाहीत त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या प्रत्येक सरकारी कामासाठी आधार कार्ड आवश्यक  आहे.या नवीन नियमांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

हे ही वाचा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, पगार वाढणार आहे 8th Pay Commission

सरकारी कर्मचाऱ्यांची मज्जा ! एका झटक्यात वाढणार 16% DA, जाणून घ्या नवीन अपडेट DA Hike

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *